| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी-आपटा रस्त्यावरील गुळसुंदे येथील तुंगारतन विद्यालयासमोरील रस्त्यावरील गतिरोधकांना पांढरे पट्टे नसल्याने अपघातांची मालिका सुरुच आहे. वाहन चालवत असताना हे गतिरोधक दिसत नसल्याने वाहने सुसाट जात असताना गतिरोधकावरुन आदळून अपघात होत आहेत. रसायनीहून गुळसुंदेकडे जाताना तसेच आपटाहून रसायनीकडे येताना या रस्त्यावरील गतिरोधक दिसेनासे झाल्याने वाहने आपटल्याने चारचाकी, दुचाकीस्वार जखमी होत आहेत. वाहन चालविताना या रस्त्यावरील गतिरोधक दिसत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या गतिरोधकांना पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी प्रवासी नागरिकांतून जोर धरु लागली आहे.







