| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात रमेश रामचंद्र कल्याणकर, रसिक रमेश कल्याणकर, रचना रमेश कल्याणकर (नवीन पनवेल) यांच्याविरोधात 17 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
रमेश, रसिक आणि रचना कल्याणकर यांनी तळोजा फेस टू, सेक्टर 16, प्लॉट नंबर सातमधील 174 मीटर क्षेत्राचा प्लॉट 2004 रोजी विलास पाटील यांना सह दुय्यम निबंधक पनवेल एक येथे खरेदीखत अन्वये विक्री केली. त्यानंतर तो प्लॉट बँकेत मोर्गेज ठेवला आणि विलास पाटील यांच्या नावे कर्ज घेतले होते. याची माहिती असतानादेखील तिघांनी सदरचा प्लॉट हा सोहेल इम्तिखाब आलम हवालदार यांना एप्रिल 2025 रोजी सह दुय्यम निबंधक पनवेल एक यांच्याकडे खरेदीखत अन्वये विक्री केली आणि त्यांच्याकडून आरटीजीएस आणि रोख स्वरूपात दीड कोटी रुपये स्वीकारले आणि सोहेल हवालदार यांची फसवणूक केली.







