| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी पाताळगंगा हा औद्योगिकीकरणाने नटलेला परिसर आहे. परिसरातील लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. यातच कामधंद्याकरिता बाहेरुन येणाऱ्या कामगारांचा लोंढा पाहता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी रसायनी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांगर हे कायदा सुव्यवस्था राखत अनेक गुन्ह्याची उकल करुन सामाजिक कार्यांतही मोलाचे योगदान देत आहेत. दरम्यान, रसायनी पोलीस ठाण्यात सणवारांना व कायदा सुव्यवस्थेकरीता होणाऱ्या बैठकांना सुसज्ज बैठक सभागृह असावा, अशी मागणी होत होती. त्या अनुषंगाने अल्काईल अमाइन्स केमिकल्सतर्फे सीएसआर निधीमार्फत रसायनी पोलीसस ठाण्यात सुसज्ज बैठक सभागृह बांधून देण्यात आले. त्याचे उद्घाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, प्रिया असो.चे अध्यक्ष सुनिल कदम, अल्कली अमाईंन्सचे व्यवस्थापक नागनाथ खकाळे, युनिट एचआर अर्चना माने आदी मान्यवरांसह अल्कलीचे ओंकार, रेन्हिवास कंपनीचे निलेश साळुंखे, पेट्रोनासचे संतोष घोले, नोव्हेझॉनचे मिनल गडगे, इतर कंपनी अधिकारी, पोलीस पाटील व पत्रकार उपस्थित होते.







