। कोर्लई । प्रतिनिधी ।
मुरुडच्या लायन्स क्लबतर्फे बोर्लीमध्ये पी.एम.जेफ.लायन अनुप थरवानी यांच्याहस्ते गरिब आदिवासी बांधवाना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. लायन्स क्लब मुरुड जंजिराचे अध्यक्ष ला. सनी सोगावकर, खजिनदार ला. मकरंद कर्णिक, सदस्य ला. भरत मोती, ला. सी. एम. ठाकूर, ला. आयेशा यावेळी उपस्थित होते. नवी मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक ला. अनुप थरवानी यांनी मुरुड तालुक्यातील गरीब व गरजूना वाटपासाठी 500 ब्लॅंकेट उपलब्ध करून दिले. यासाठी उलवे नवी मुंबईतील लायन मिलिंद पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.





