| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने 15 राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा 2025 मालवण चिवला बीच येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत 1 किमी, 2 किमी, 3 किमी झालेल्या स्पर्धेत सहभाग घेऊन रायगडच्या खेळाडूंनी वैयक्तिकरित्या सहभाग नोंदवून पदके मिळवून शिहू- बेणसे विभागाची शान वाढवली आहे. त्यामुळे या सर्व विजेत्या खेळाडूंचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे. या स्पर्धा वयोगट 6 ते 56 वयो गट अशा होत्या. या स्पर्धेत भारत देशातील अनेक राज्यातील 1500 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता, त्यामुळे या स्पर्धेचे विशेष महत्व होते. या स्पर्धेत जलद गतीने अंतर पार करणाऱ्या खेळाडूंना विशेष गौरवण्यात आले.
1. मनन घासे (मुंढाणी) 2 किमी, 2. त्रिशूल कुथे (बेणसे) 1 किमी, 3. क्रिश कुथे (झोतीरपाडा) 2 किमी 2रा क्रमांक, 4. मयुष ठाकूर (तरशेत ) 3 किमी, 5. रियांश ठाकूर (तरशेत ) 1 किमी 7 वा क्रमांक, 6. पलक पाटील ( शेतजुई ) 3 किमी, 7. जान्हवी पाटील ( शेतजुई ) 3 किमी, या खेळाडूंनी सहभागी होऊन विजेते पदके मिळवली. या यशात प्रख्यात जलतरण प्रशिक्षक सुनील पवार यांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण व विशेष सहकार्य लाभले.







