| आपटा | प्रतिनिधी |
अल्काईल अमाइन्स केमिकल्स लिमिटेड यांच्या मुख्य प्रायोजक आणि बॉम्बे डाईंग यांच्या सहप्रायोजकतेमधून प्रेरणा जल्लोष या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा पारितोषिक समारंभ बॉम्बे डाईंग कॉलनीत नुकताच पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथि म्हणून पोलीस उप अधीक्षक डॉ. विशाल मेहुल व रसायनीचे पोलीस इनचार्ज संजय बांगर यांनी उपस्थिती लावली. यावेळी अल्काईल अमाइन्स केमिकल्स लिमिटेडचे सीएचआरओ उदय घाग, सिनियर मॅनेजर मॅथ्यू कुन्हा, वर्क्स मॅनेजर नागनाथ खटकाळे, युनिट एचआर अर्चना माने, सिनियर ऑफिसर सीएसआर निकिता म्हात्रे, प्रेरणाचा मुख्य समन्वयक के.आर. ओंकार यांच्यासह बॉम्बे डाईंगचे मॅनेजर रजनीश दत्त, आणि जनरल मॅनेजर सोमेश्वर काळे आदी उपस्थित होते.







