| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील दिघेवाडी येथे प्रथमताच जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन शनिवारी (दि.27) करण्यात आले आहे. दिघेवाडी या गावाला कबड्डी या खेळाचा कोणताच प्रकारचा वारसा नसताना अलीकडे या गावातील महिलांनी शिक्षक संजय थळे यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी खेळायला सुरुवात केली. त्यामुळे कमी कालावधीत हा संघ तयार झाला. या गावातील ग्रामस्थांनी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत घेऊन कबड्डी स्पर्धेचे दिमाखदार नियोजन केले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी 11,001 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी 7,001 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक, तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी 5,001 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पक्कड व पब्लिक हिरो यांनाही आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.







