| रोहा | प्रतिनिधी |
पर्यावरण, शेतीसह समाजाच्या हितासाठी लढणाऱ्या बळीराजा फाऊंडेशन संस्थेने भुवनेश्वर ते बारसोली रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. वारंवार मागणी, तक्रारी करूनही रस्त्याची साईडपट्टी भरण्यात आली नाही.
अनेक ठिकाणी रस्ता नादुरुस्त झाला आहे. यातून रस्ता खड्डे मुक्त व्हावा, दुतर्फा साईडपट्टी रस्त्याचा गवत काढावा, झाडे संवर्धन सुरक्षित करावीत, साकाव दुरुस्त करावे, वरसे भागातील गणेशनगर झोपडपट्टीतील रस्त्याचे खड्डे भरावेत, सर्वार्थाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशा आशायाचे निवेदन बळीराजा फाऊंडेशनच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय बागुल यांना देण्यात आले. बळीराजा फाउंडेशनच्या पदाधिकारी व उपविभागीय अभियंता विजय बागुल यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. यावेळी अध्यक्ष विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव, सचिव ॲड. दीपक भगत, खजिनदार रुपेश साळवी, तळाघर ग्रा. पं. सदस्य संजय भगत, जनार्दन ढेबे, नितेश बामुगडे, जयवंत शिगवण, महेंद्र मोरे, उद्धव आव्हाड, महेश मोहिते, ज्ञानेश्वर चंद्रवंशी आदी उपस्थित होते. उपविभागीय अभियंता विजय बागुल यांच्याशी शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने साईडपट्टी भरणे, झाडांतील गवत साफ करणे, खड्डे भरण्याचा काम तातडीने पूर्ण केला जाईल असे बागुल यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले. तसेच रस्ता दुरुस्ती तातडीने केली जाईल असे आश्वासन बांधकाम प्रशासनाने दिल्याने रस्त्याची दुरुस्ती तातडीने सुरू होईल अशी अपेक्षा अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केले.







