मुंबई | प्रतिनिधी |
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नवीन वर्षात म्हणजे जानेवारी 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दरम्यान हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणे अपेक्षित असल्याने हिवाळी अधिवेशन जानेवारीत होणार आहे. विधान परिदेच्या निवडणुका येत्या 10 डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाणार आहे.