राष्ट्रीय बाक्सिंग स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक
| अलिबाग | प्रतिनिधी |
सातारा येथे झालेल्या राष्ट्रीय लेवल बाक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करताना स्वस्ती संदेश नाईक हिने नुकतेच सुवर्णपदक पटकाविले आहे. स्वती ही रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बागमळा गावची रहिवासी आहे. वडिलांच्या नोकरीनिमित्त ती पुणे येथे वास्तव्यास आहे.
दरम्यान, पुणे-मावळ येथील जैन इंग्लिश स्कूलमध्ये स्वस्ती इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे. वयाच्या 11 व्या वर्षी तिने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर, स्कूल गेम, खेलो इंडिया खेलो अशा स्पर्धेत भाग घेऊन पाच सुवर्ण, सात रौप्य तर पाच कास्यंपदके पटकावली आहेत. स्वस्ती नाईक हिला यशवंत माने, संदीप माने, आथर्व कावरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शालेय अभ्यासाबरोबरच स्वतीने बॉक्सिंगमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देण्यात येत आहेत. ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करुन देशासाठी पदक मिळवायचे स्वप्न स्वतीने बोलून दाखवले. लेकीच्या यशाने आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आईवडील, प्रशिक्षक आणि शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे यश मी मिळवू शकले, असे स्वतीने सांगितले. स्वती नाईक हिचे मूळ गाव असलेल्या अलिबाग तालुक्यातील बागमळा येथील ग्रामस्थांनीसुद्धा तिच्या नावाचे नाक्यावर मोठे बॅनर लावून फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







