| मुंबई | प्रतिनिधी |
गणेश माळी दिग्दर्शित, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात चित्रीकरण सुरु असलेल्या चौफेर या मराठी वेबसिरीजची सध्या चौफेर हवा आहे. पहिल्या सीजनचे चित्रीकरण पूर्ण करून, लगेचच या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीजनचे चित्रीकरण जानेवारीमध्ये सुरु होणार असून, नवीन वर्षात ही वेबसिरीज प्रेक्षकांना “नटखट प्रॉडकशन्स ऑफिशिअल” या यु ट्यूब चॅनलवर पाहता येईल, अशी माहिती वेब सिरीजचे मुख्य निर्माते सचिन वालम यांनी दिली. सदर वेब सिरीजमध्ये प्रेमाची गोष्टी सांगण्यात आली असून, ही वेबसिरीज चौफेर प्रेमाचे पैलू उलगडणार आहे.
नटखट प्रॉडक्शन्स, मुक्ता प्रॉडक्शन्स आणि रामा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या या वेबसिरीजची कथा-पटकथा-संवाद गणेश सीताराम माळी यांनी लिहिलेले असून, दिग्दर्शनाची जबाबदारीदेखील त्यांनीच पार पाडली आहे. संपूर्ण चौफेर टीम या वेबसिरीजसाठी अपार मेहनत घेत आल्याचे दिग्दर्शक गणेश माळी यांनी सांगितले व पाहिलेले स्वप्न सत्यात उतरत असताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली.
या वेबसिरीजसाठी निर्माता – सचिन वालम, सह निर्माता – सुशील मोरे, सह दिग्दर्शक – प्रसिद्धी – विधान पवार, छायांकन – प्रितेश घडवले, संकलन – कलर – अभिषेक पाडेकर, व्ही एफ एक्स – श्रेयस प्रेयस, लाईट्स – वैभव माळी, सुरज माळी, अस्मिन हंबीर, रंगभूषा वेषभूषा – प्रदीप जाधव, निर्मिती व्यवस्थापक – अतुल पवार, पोस्टर – अजय माळी, अनिकेत राहाटे ,शीर्षक गीत – सुशांत माळी, व्यवस्थापक – सिकंदर हंबीर,आकाश पवार, श्रीकांत कासारे , साहिल जाधव , योगेश तांबे , दिनेश जाधव आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत असून सेटवर हसत खेळत वातावरण असल्याचे टीम चौफेरकडून सांगण्यात आले. या वेबसिरीजमध्ये संजित पेडणेकर, अतुल पवार, शुभम किजबिले, श्रेयस मोरे, श्रावणी आईनकर, साधना सुतार, स्वेता गणवे, अनोमा जाधव, आकांक्षा तांबडे, मंदार मुसळे, दिलीप मराठे, शांताराम पवार, सुभद्रा फुंदे, दीपांजली धाडवे, दीपाली काटकर, अनंत कोबनाक, हे कलाकार मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहेत.







