। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अतिरिक्त पाताळगंगा एमआयडीसी हद्दीत सोमवारी (दि.29) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकी स्वारांचा अपघात झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाताळगंगा रसायनी हद्दीतील रेन्युसिस कंपनी जवळ दोन दुचाकी स्वारांचा समोरासमोर येऊन अपघात झाला. सिद्धेश्वरी कॉर्नर कडून कासपच्या दिशेने जात असताना (MH-46-DB 8337) या दुचाकी वाहनाची समोरील येणाऱ्या वाहन क्रमांक (MH-06-BB 0968) या वाहनाला जोरात धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की, यामध्ये MH-06-BB 0968 या क्रमांक च्या दुचाकीस्वाराला पायाला किरकोळ दुखापत झाली. तर MH-46-DB 8337 वरील वाहन चालक संतोष रामा लेंडे, (21), रा. माडभुवन, सारसई याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रसायनी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक कोंडी दूर करून मयत संतोष लेंढे यास चौक येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. यावेळी डाॅक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले.







