| रसायनी | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्यस्तरीय इंटरस्कूल चॅम्पियनशिप 2025 चे भव्य आयोजन दौंड (पुणे) येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे आयोजन अभिजीत हरपळे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले होते. स्पर्धेत रायगडसह विविध जिल्ह्यांतून 200 हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
चुरशीच्या स्पर्धेत मास्टर भूपेंद्र मार्शल आर्ट स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडेमीच्या 36 खेळाडूंनी सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले. अकॅडेमीच्या खेळाडूंनी 15 सुवर्ण, 12 रौप्य व 09 कांस्यपदकांची कमाई करत एकूण 36 पदके मिळवून मानाची द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली.
विजेते खेळाडू – मुलांची यादीत सुवर्ण पदक विजेते : सम्बुद्ध कांबळे, करण सत्रे, निहार शिंदे, अवनीश सगट, राज शितोळे, अवीर बनसोडे, स्वराज इंगळे, वेदांत दत्तात्रय शेटे, यश मोरे, ध्रुव कोलतेकर रौप्यपदक विजेते : विहान फडतरे, देवेश नवीन, ध्रुव दिघाडे, स्वराज पाटील, श्रवण पाटील, प्रमोद ठोंबरे. कांस्यपदक विजेते : अथर्व तिवारी, राजवर्धन भालेराव, ऋतुराज प्रविण ठाकूर, मंथन रोटे.
मुलीं सुवर्णपदक विजेते :अविका सिंग, नित्या सावरकर, आरुषी सुतार, वृद्धी बिरादार, आयुषी माने. रौप्यपदक विजेते : काव्या सकलानी, रुत्विका जयेश नागले, स्वरा पिसाळ, स्वराली सगट, प्रेरणा भगवत देवकर, दिक्षा घाग. कांस्यपदक विजेते अक्षया बनसोडे,अन्वी मोरजकर, जिया मंगेश डोंगरे, स्नेहल आडव, अमृता मोहिते. प्रशिक्षक मास्टर भूपेंद्र गायकवाड यांचे मोलाचे योगदान लाभले. या यशामागे मुख्य प्रशिक्षक भूपेंद्र गायकवाड यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.







