| भाकरवड प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील भाकरवड गावाचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप जयराम पाटील त्यांच्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. दि. 1 सप्टेंबर 1991 रोजी ते पहिल्याच प्रयत्नात पोलीस भरतीत रायगड पोलीस दलात यशस्वी झाले. त्यांनी पोलीस ट्रेनिंग सेंटर अकोला येथे दोन वर्ष पूर्ण करून प्रथमच अलिबाग पोलीस मुख्यालय 1993, त्यानंतर माणगाव, अलिबाग, खालापूर, रोहा, नागोठणे, अलिबाग मुख्यालय पोलीस उपनिरीक्षक पोलीस नियंत्रण कक्ष 2022 श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अशा विविध पोलीस ठाण्यात त्यांनी आपली सेवा बजावली. त्यांच्या उत्तम सेवेच्या कारकीर्दीत 70 रिवार्ड प्राप्त झाले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती घेऊन ते दि. 31 डिसेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती सोहळा भाकरवड येथील निवासस्थानी 4 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, तर पोलीस खात्यातील दत्ता श्रीवर्धनकर, हेमाडे सर, सुदेश मार्कंडे, दुशांत जाधव, प्रमोद सर, जितेंद्र भामरे, उदय सावंत, मंगेश भाऊ, सुधीर पाटील, संजय लांगी, दीपक चांदो रकर, प्रतीक पाटील, रमेश थवई आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांचा स्वागत सत्कार पाटील कुटुंबियांनी केला.







