| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कोंडीवडे राज्यमार्ग रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे भरून रस्ता सुस्थितीत आणण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार होते. हे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याने पाळले नसल्याने पोलीस मित्र संघटनेने पुन्हा उपोषण सुरू केले आहे.
कर्जत आणि खालापूर तालुक्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी उपोषण सुरू केले होते. त्यावेळी दोन्ही तालुक्यातील सर्व रस्ते पावसाला संपताच सर्व खड्डेमुक्त केले जातील असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण यांनी दिले होते. मात्र, रस्त्यांची दुरुस्तीची कामे केली नाही आणि त्यामुळे पोलीस मित्र संघटनेचे कोकण अध्यक्ष रमेश कदम यांनी उपोषणाला सुरुवात केली. आश्वासनाची पुर्तता झाली नाही आणि त्यामुळे अनेक रस्त्यावर अनेक वाहन चालकांचे जिवघेणे अपघात होऊन जिवीतहानी होत आहे. तमनाथ बोट क्लब ते आडिवली दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले ते निकृष्ट दर्जाचे झाले होते आणि त्यामुळे रस्तावर लगेच खड्डे पडले. या खड्डे पडलेल्या रस्त्यावर होणारे कार्पेट डांबरीकरण मंजूर देखील झालेले नाही. खांडपे -सांडशी, खांडपे, कोंदिवडे हा रस्ता खड्डेमय रस्ते खड्डेमुक्त करून रस्त्याचे नुतनीकरण करणार की नाही लेखी खुलासा केलेला नाही. कर्जत- खालापूर तालुक्यातील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी उपोषण सुरू केले आहे. कदम यांनी या सर्व रस्त्यावर कार्पेट डांबरीकरण सुरू होत नाही तोवर उपोषण सुरूच राहणार असा निर्धार केला आहे.







