| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
क्षात्रैक्य समाज संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त शनिवारी (दि.10) अखंड भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या कुरूळ येथील सभागृहात संपन्न होणाऱ्या, स्व. प्रभाकर सदाशिव राणे स्मृती भजन महोत्सवात निमंत्रित दहा भजन मंडळे सहभागी होणार आहेत. यामध्ये अलिबाग तालुक्यातील जागृती पाटील, जयवंत पाटील व संदीप पाटील, प्रकाश नाईक, चेतन पाटील, भूषण माळवी व दयानंद भगत, समर्थ पाटील, नरेश कडू, निलेश जंगम, नितीन पाटील हे आपल्या भजन मंडळा सह सहभागी होणार आहेत. याशिवाय सुप्रसिद्ध भजन गायिका प्रणिता देशमुख यांनाही निमंत्रित केले आहे. सुप्रसिद्ध पखवाज वादक सुशांत पाटील हे आपल्या शिष्यवृंदा सोबत पखवाज सहवादन करणार आहेत. शेवटी चक्री भजन जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये आदिनाथ सटले आणि महेश कंठे हे दोन सुप्रसिद्ध भजन सम्राट सहभागी होणार आहेत. भजन महोत्सवाचा लाभ संगीत आणि भजन रसिकांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष द्वारकानाथ वामन नाईक, सचिव प्रदीप कृष्णाजी नाईक आणि भजन महोत्सव समिती प्रमुख ॲड. प्रसाद शांताराम पाटील यांनी केले आहे.







