। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
पतीसोबत झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी पाटा घालून तिला गंभीर जखमी केले. या प्रकरणी पती महादेव कैलास बनकर राहणार घोटगाव यांच्या विरोधात मंगळवारी (दि. 20) तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 जानेवारी रोजी महादेव बनकर हे कामावरून घरी आल्यानंतर त्यांचे पत्नीसोबत भांडण झाले. यावेळी पतीने वॉकर स्टिकने मारहाण केली. त्यानंतर केसाला पकडल्याने त्या तोल जाऊन खाली पडल्या. यावेळी लाकडी पाटा डोक्यात मारला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर तळोजा एमआयडीसी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.







