| सुकेळी | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील सुकेळी येथील बी.सी. जिंदल रुग्णालयाच्यावतीने कोंडगाव येथे शनिवारी (दि.17) मोफत हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकुण 108 नागरीकांची जिंदल रुग्णालयातील डॉ. मनिष रायकवार यांनी मोफत हृदय तपासणी केली. तसेच, विविध आजारांवर तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
या शिबिरामध्ये नागरीकांची ईसीजी, रक्तदाब तपासणी, शरीरातील साखरेचे प्रमाण तपासून मोफत औषधे देण्यात आली. तसेच ताप, सर्दी, खोकळा, सांधेदुखी, गुडघेदुखी अशा विविध आजारांची तपासणी करून औषधे देण्यात आली. त्याचबरोबर पुढील उपचारासाठी डॉ. मनिष रायकवार यांनी नागरीकांना मोलाच मार्गदर्शन केले. या शिबिराला जिंदल रुग्णालयाचे व्यवस्थापक सर्वेश पांचोली, कमलेश अस्थांना, डॉ.मनिष रायकवार, कोंडगावचे माजी सरपंच अनंत वाघ, सामाजिक कार्यकर्ते अरविंद बुरुमकर, ग्रामसेविका जावळे, शिक्षिका भाटकर, मधुकर मालुसरे, सुधाकर धामणे, वसंत हंबीर, वंदना बुरुमकर, सुनिता साजेकर, किरण सुटे, शरन्या श्रीजीत, मोहीनी जांबेकर, अदिती जंगम, स्नेहल ढाणे, रामदुल्हारे, संदिप चाळके आदी उपस्थित होते.






