| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड उत्तर अंतर्गत शाखा तालुका पेण व श्रमण बुद्ध विहार कमेटी व क्रांतीनगर ग्रामस्थ यांच्या वतीने पाच दिवसीय बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचा समारोप पेण येथे गुरुवारी (दि.22) उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांनी मोलाचे मार्गदर्शन करीत उपस्थितांना संबोधित केले.
रविवारी (दि.18) ते गुरुवारी(दि.22) या पाच दिवसांच्या कालावधीत झालेल्या बालसंस्कार शिबीराचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष सुशील वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या शिबिरात 46 शिबिरार्थी सहभागी झाले होते. पाच दिवस चाललेल्या शिबिराला जिल्ह्यातील नामवंत केंद्रीय शिक्षकांनी विविध विषयावर खूप साध्या भाषेत शिबिरार्थीना सहज समजेल असे सखोल मार्गदर्शन केले. शिबिराचा समारोप गुरुवारी (दि.22) जिल्हा अध्यक्ष सुशील वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनावणे, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष संतोष जाधव उपस्थित होते.
यावेळी सुशील वाघमारे यांनी बाल संस्कार शिबिरे घेणे व त्याचे सातत्य ठेवणे खुप महत्वाचे असून, ते काम पेण तालुका यशस्वीपणे करीत असल्याचे सांगितले त्यानंतर त्यांनी 24 शिबिरे व 22 प्रतिज्ञा या विषयावर सखोल भाष्य केले. यावेळी जिल्ह्याच्या वतीने प्रमाणापत्र देऊन सन्मान करण्यात आला. शैला गायकवाड यांच्याकडून भेट वस्तू देऊन शिबिरार्थीना देण्यात आले. जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनावणे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, शशिकला गायकवाड, हर्षल मोरे,
सचिन कांबळे यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत सोनावणे यांनी पेण तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सांगितली. त्यांनी शिबिरार्थिना मार्गदर्शन करतांना उपस्थितांना भावनिक आवाहन करीत सांगितले की येणाऱ्या काळात आपण भव्य श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर घेत असून त्या शिबिरात आपण मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन केले. शिबीर यशस्वी होण्यासाठी पेण तालुका पदाधिकारी व क्रांतीनगर ग्रामस्थ यांनी खुप मेहनत घेतली. पाच दिवस चाललेल्या शिबिराला श्रमण बुद्ध विहार महिला पदाधिकारी यांनी प्रतीदिन शिबिरार्थीना अल्पोपहाराची व्यवस्था केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संरक्षण उपाध्यक्ष मंगेश कांबळे यांनी केले.






