| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोलीतील एकूण 15 प्रभागात शिंदे गट 14, अजित पवार गट 7, अपक्ष 1, भाजप 4, शेकाप 4, शरद पवार गट 1 असे उमेदवार निवडून आले आहेत. यावेळी पहिल्याच वर्षी उपनराध्यक्षपद भाजपला दिले आहे. खोपोली नागपालिकेच्या नगराध्यक्षपदी कुलदीपक शेंडे यांनी पदभार स्विकारल्यानंतर शुक्रवारी (दि.23) सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. विविध सभापती पदासाठीच्या निवडणूकिसाठी पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी पंकज पाटील होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम सभापती अनिल सानप (शिंदे गट), सार्वजनिक क्रीडा सांस्कृतिक कार्य समिती सभापती अमित काळे (शिंदे गट), स्वच्छता वैद्यक व आरोग्य समिती मयुरी शेलार (शिंदे गट), नियोजन व विकास समिती सभापती प्रतीक्षा रेटरेकर (भाजप), महिला व बालकल्याण समिती सभापती सुवर्णा मोरे (शरद पवार गट), परिवहन सभापती किशोर पाटील (भाजप), स्थायी समिती सदस्य संदीप पाटील, विनायक तेलवणे (अजित पवार गट) व हरीश काळे (शिंदे गट) यांची निवड करण्यात आली.







