| तळा | प्रतिनिधी |
जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स, तळा येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदान जनजागृतीसाठी भितीपत्रके व रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मतदानाचे हक्क, लोकशाही आणि जनजागृती या विषयांवर आकर्षक व संदेशात्मक रांगोळ्या साकारल्या. तसेच भितीपत्रके स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘मतदान हेच आपले कर्तव्य’, ‘लोकशाहीची ताकद मतदार’ अशा विषयांवर प्रभावी भितीपत्रके सादर केले.
रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पाटील रिद्धी योगेश, द्वितीय क्रमांक घाडगे तनिषा तुकाराम आणि तृतीय क्रमांक बारटक्के श्रावणी गिरीश या विद्यार्थिनींनी यश संपादन केले. भित्तीपत्रके स्पर्धेत प्रथम क्रमांक शेख खिलकत अबुलहुसैन, द्वितीय क्रमांक खोपटकर फातिमा मन्सूर अहमद आणि तृतीय क्रमांक फटाकरे फातिमा इकबाल या विद्यार्थिनींनी यश संपादन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढली व युवा वर्गात मतदार जागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला. भितीपत्रके व रांगोळी स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तळा तहसीलदार मा. स्वाती पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर, राष्ट्रीय मतदार दिन/ माझा भारत माझे मत उपक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन उल्लेखनीय कामाबद्दल राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एन. एम. शेख व डॉ. पी. बी. अभंगे यांना माननीय तहसीलदार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन बंगाळे यांचाही प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.







