| रसायनी | प्रतिनिधी |
जय जगदंबा महिला मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय खांडस या विद्यालयातील आदीवासी डोगंराळ भागातील विद्यार्थ्यांना भारतीबेन रमणिकलाल शहा चरिटेबल ट्रस्टच्यावतीने तीन वर्ग खोल्या, शाळेसाठी कार्यालय, शाळेच्या पूर्ण इमारतीस रंगरंगोटी, लाईट फिटींग, पाण्याची टाकी व पाईपलाईन, विद्यार्थ्यांना खेळाचे मैदान तसेच आर्थिक सहकार्य विद्यालयाला देण्यात आले. विद्यालयाच्या वर्ग खोल्यांचे व कार्यालयाचे व इतर कामाचे उद्घाटन शैलेश रमणिकलाल शहा व रंजना शैलेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शेडगे, रामेश्वर दिगंबर, राकेश गोपाळ चव्हाण, किसन महादू ऐनकर, किर्तनकार कैलास महाराज, सरपंच, पोलिस पाटील, ग्रामस्थ नागरिक, माजी विद्यार्थी, सामाजिक, धार्मिक, राजकीय, शिक्षकवर्ग, इतर कर्मचारी, राजिप प्राथमिक शाळेतील शिक्षक तसेच विद्यार्थी उपास्थित होते.







