| उरण | प्रतिनिधी |
फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन रविंद्र पाटील, ट्रस्टी जे.एन.पी.ए.यांच्या हस्ते मैदानाचे पूजन व नारळ वाढवून करण्यात आले. प्रभारी प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर, डॉ.श्रेया पाटील कार्याध्यक्ष, महाविद्यालयातील उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक व महाविद्यालयातील सेवक उपस्थित होते. रविंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतातून खेळाडूना प्रोत्साहन दिले. खेळ हा मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे असतो. खेळाडूनी खेळात मित्रत्व जपले पाहिजे, त्यांच्या हस्ते सामन्यांचे उद्घाटन झाले. प्रा.देवेंद्र कांबळे, क्रीडा संचालक यांच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कबड्डी,क्रिकेट, भालाफेक, थाळीफेक, लांबउडी, धावणे, बुद्धिबळ, इत्यादी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्य, डॉ.आमोद ठक्कर यांनी खेळाडू विद्यार्थ्यांशी ओळख करून घेतली स्पर्धा अतिशय खेळीमेळीत व्हायला हवी, असे मत व्यक्त केले.






