मुंबई | प्रतिनिधी |
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या दादर, शिवाजी उद्यान येथील वास्तुत शनिवारी दि. 27 नोव्हेंबर 2021 पासून नामवंत व्यंगचित्रकारांच्या मार्गदर्शनाखाली व्यंगचित्र कार्यशाळा सुरू करण्यात येत आहे. कोरोनामुळे सुमारे दोन वर्षे ही कार्यशाळा बंद करावी लागली होती. यामध्ये व्यंगचित्रविषयक संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी मोबाईल क्रमांक 9819523741 यावर संपर्क साधावा.