| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मेघालयातील कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात दहा मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन पोहोचलं आहे. त्यांनी बचाव कार्य सुरु केलं आहे. मेघालयाच्या ताशखाई परिसरात असलेल्या एका कोळसा खाणीत हा स्फोट झाला. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरु केलं. खाणीत काम करणाऱ्या मजुरांना त्यांचा जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही. त्यांना खाणीतून बाहेर पडताच आलं नाही. या दुर्घटनेत दहा मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यातील बहुतांश मजूर आसामचे आहेत. पण प्रशासनानं अद्याप तरी यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेलं नाही.





