दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी 16 तज्ज्ञांची नियुक्ती; पालक-शिक्षकांनाही मार्गदर्शन
। रायगड | प्रतिनिधी |
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेसाठी आवश्यक ती तयारी राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाकडून पूर्ण करण्यात आली आहे. या विभागातून दहावी आणि बरावीच्या परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावाखाली अथवा परीक्षांच्या भीतीसंदर्भात येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी एकूण 16 समूपदेशक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी विभागीय मंडळाकडून या समुदेशकांची यादी, त्यांचे दुरध्वनीक्रमांकही संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत.
मुंबई विभागात नियुक्त करण्यात आलेल्या सर्व 16 पूर्णवेळ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सकाळी 8 ते रात्री 8 दरम्यान विद्यार्थी, पालक, शिक्षकांना मार्गदर्शन करीत आहेत. यात विद्यार्थ्याना परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यासमोर पडलेले प्रश्न, त्यांना निर्माण झालेली चिंता, आदींसोबत विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती, अभ्यास नियोजन, वेळ व्यवस्थापन, गुणांची चिंता, अपयशाची भीती आणि मानसिक ताण भेडसावतो. समुपदेशक आत्मविश्वास वाढवून सकारात्मक अभ्यास पद्धती शिकवतील आणि मार्गदर्शन करतील.
पालकांना मुलांच्या अपेक्षा, अभ्यासाचा ताण, करिअर निवडीबाबत संभ्रम आणि संवादातील अडचणी आदी भेडसावणाऱ्या अडचणींवर सर्व समुपदेशक पालकांना मुलांना मानसिक आधार, अभ्यासासाठी योग्य वातावरण आणि सकारात्मक प्रोत्साहन देण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई विभागात नेमण्यात आलेल्या या समुदेशकांसोबत विद्यार्थी, पालकांनी तसेच शिक्षकांनीही फोनद्वारे संवाद साधावा, असे आवाहन विभागीय अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी केले आहे.
समुपदेशक कार्यरत असलेल्या शाळा
बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल चेंबूर, ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा, सरस्वती विद्यालय कांजुर, स्वामी विद्यालय मुलुंड पश्चिम, जनता शिक्षण संस्था हायस्कूल, इंडियन एज्युकेशन सोसायटी वांद्रे पूर्व, अ.भी. गोरेगावकर इंग्रजी शाळा गोरेगाव, बालविकास विद्यामंदिर जोगेश्वरी पूर्व, नूतन विद्यालय नालासोपारा, प्रतिभा विद्यामंदिर खानिवडे, गजानन विद्यालय कडव, सुधागड हायस्कूल, नवी मुंबई हायस्कूल वाशी, साई कृपा विद्यालय मरोळ, प्रगती हायस्कूल अंधेरी, मातृभूमी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल सायन.
असे आहेत संपर्क क्रमांक, 8108150437, 986955670, 8104939260, 9869484516, 88500541839702006003, 9702008053, 9820166994, 9820166994, 9820782057, 98207820979702852000, 9702852000, 9699531452, 9806531452, 9028270953, 9880330468, 9890330408, 9020929779, 9669376250, 9937302010, 9987582610,98218711546, 9821879648, 9830110159, 9322105613, 9699167860.






