| माणगाव | प्रतिनिधी |
शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्था ता.माणगाव (रजि.) या संस्थेतर्फे सलग 10 व्या वर्षी के.ई.एम रुग्णालय परेल, मुंबई यांच्या सौजन्याने व विशेष सहकार्याने शिवजयंती निमित्त शुक्रवार दि.13 फेब्रुवारी 2026 रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन सरलादेवी मंगल कार्यालय हॉल, उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे, सिद्धीनगर माणगाव या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत करण्यात आले आहे. तरी रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान करावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्था माणगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन सकाळी 9 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू प्रमाणपत्र, रक्तदान केल्याचे ओळखपत्र तसेच विशेष कॉलेज विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी उपयुक्त पडणारे सर्टिफिकेट के.ई.एम. रुग्णालय मुंबई यांच्यातर्फे देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.





