| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील विघवली येथे रविवारी (दि.22) धन्य निरंकार संस्थेच्या सेवाभावी सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. कडापे व खरवली शाखेच्या माध्यमातून आयोजित या अभियानात अपर्णेश्वर मंदिर व तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली. तलावातील शेवाळ, पालापाचोळा व कचरा बाहेर काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमातून ‘जल स्वच्छ, मन स्वच्छ’ हा संदेश देण्यात आला.
अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी सुधाकर साबळे (कडापे) व शंकर सारंगे (खरवली) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. यावेळी व्यासपीठावर गावचे सरपंच वैष्णव साठे, ग्रामसमिती अध्यक्ष सुधीर सापळे, जेष्ठ नागरिक अनंत गो. साठे, वसंत साठे, अनिल साठे, सुशांत कोदे व पोलीस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमास शुभेच्छा देऊन आयोजकांचे स्वागत केले. महिला प्रतिनिधी सपना सारंगे, लता सुर्वे व स्नेहा सालदूर यांनी नियोजनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच आश्विनी सालदूर व अरविंद सालदूर यांनी भोजनाची पूर्वतयारी केली असल्याची माहिती भाऊ देवू सापळे यांनी दिली. महेंद्र सापळे, गणेश सापळे आदी ग्रामस्थांनी उपस्थित पाहुण्यांना अल्पोपहाराची सेवा दिली. जेष्ठ सदस्या इंदुताई कानडे व जगन दादा कानडे यांनीही उपस्थित राहून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान शंकर सारंगे यांचा चंदन देऊन गणेश जंगम यांनी सत्कार केला. तसेच धन्यनिरंकार संस्थेचा दर सोमवारी विघवली येथे सत्संग होत असून त्यातून समाजात चांगले संस्कार घडत असल्याची माहिती बेरडे यांनी दिली. ग्रामस्थांनी या स्वच्छता अभियानाचे कौतुक करून आयोजकांचे आभार मानले.







