| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच सरकारी नोकरी करणाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता नेमका कधी मिळणार? असे विचारले जात होते. दरम्यान, आता राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी तसेच पात्र कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळालेली आहे. आता सरकारने अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तशी माहिती वित्त राज्यमंत्री आशिस जयस्वाल यांनी सांगितले आहे. या निर्णयानुसार आता महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्के करण्यात येणार आहे.
वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानपरिषदेत तसे निवेदन सादर केले आहेयासंदर्भात वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज विधान परिषदेत निवेदन सादर केले. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. महागाई भात्यातील ही वाढ जुलै 2025 पासून लागू करण्यात येणार आहे. जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकीची रक्कम मार्च 2026 मध्ये अदा करण्यात येईल. तसेच नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार या निर्णयाचा लाभ सुमारे 5.96 लाख कार्यरत शासकीय कर्मचारी तसेच 8.12 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक बळ मिळून त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. हा निर्णय घेतल्यानंतर राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून राज्यातील सर्व घटकासोबत राज्य शासनाच्या आर्थिक सुरक्षिततेस ही प्राधान्य देत असल्याचे वित्त राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटले. दुसरीकडे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ही खुशखबर मिळालेली असताना दुसरीकडे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठीही आठव्या वेतन आयोगाचे काम चालू झाले आहे. लवकरच आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.







