| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
काही महिन्यांपूर्वी हातोंड ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या जबरी दरोड्याच्या गुन्ह्यात पाली पोलिसांनी जाबाज कामगिरी करीत महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. पाली पोलीस ठाणे यांनी जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदारांना परत केला आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे. या दरोड्याने हातोंड गोंदावं सह सुधागडात मोठी दहशत निर्माण केली होती.
त्यातील पहिल्या दरोड्यातील 37 हजार किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. ते संभाजी वाघमारे परत करण्यात आले. तसेच, दुसऱ्या दरोड्यातील 2 लाख 50 हजार किंमतीची सोन्याची चैन जप्त करण्यात आली होती. या प्रकरणातील अनंत जाधव यांना न्यायालयाच्या आदेशानुसार सोन्याची चैन परत देण्यात आली. असा एकूण 2 लाख 87 हजार रुपये किमीचा मुद्देमाल पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर व पथकामार्फत सबंधितांना परत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पाली परिसरात कायद्याचा धाक पुन्हा अधोरेखित झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे स्वागत केले आहे.







