। पनवेल । प्रतिनिधी ।
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कळंबोली येथे सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शेकडो महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे या शिबिरात महिलांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, कान-नाक-घसा तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच संपूर्ण शरीर तपासणी करण्यात आली. खारघर, नवी मुंबई येथील मेडिकल हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांसह सुमारे 10 जणांच्या वैद्यकीय पथकाने नागरिकांची सविस्तर तपासणी केली. तसेच आवश्यक ते आरोग्य मार्गदर्शनही देण्यात आले. या शिबिरात जवळपास शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती डॉ. मृणाल आमले यांनी दिली. तपासणीनंतर डॉक्टरांनी नागरिकांना संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे परिसरातील अनेक महिलांना आणि नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळाला.







