। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील सावरखर येथील राहणारे दामोदर कुंडाजी घरत यांचे सोमवार (दि. 14) रोजी अल्पश्या आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 90 वर्षे होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन सुना, दोन मुली व 20 नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी बुधवारी (दि.23) श्री क्षेत्र माणकेश्वर (केगाव) व उत्तरकार्य शुक्रवारी (दि.25) राहत्या घरी सावरखार ता.उरण येथे होणार आहे.