| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव फडके नाट्यगृह शेजारील फूटपाथची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी खड्डे, तुटलेली फरशी व अस्वच्छता यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. दररोज मोठ्या संख्येने नागरिक या मार्गाचा वापर करत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. संबंधितांनी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





