एक जण जखमी
। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
कोन फाटा ते रसायनी रोडवरील इंडिया बुल्स सोसायटीजवळ मोटरसायकल व स्कुटी यांच्यात समोरासमोर धडक झाली. ही घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली असून या अपघातात कळंबोली येथील महेंद्र रामनारायण यादव हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच त्याच मार्गावर पेट्रोलिंग करत असलेल्या नवीन पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संजय जाधव, पोलीस हवालदार संजय गावडे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल चंदू सूर्यवंशी व दत्ता उबाळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नवकार लॉजिस्टिक कंपनीची रुग्णवाहिका बोलावून जखमी यादव यांना तातडीने एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे उपचारासाठी रवाना केले. तसेच दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पुढील कारवाईसाठी दोन्ही वाहने पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत.







