। पनवेल । प्रतिनिधी ।
तळोजा एमआयडीसी परिसरातील पेंधर फाट्याजवळील नावडा सर्व्हिस स्टेशन येथे एका भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राजूसिंग रजपूत (28) असे मृत तरुणाचे नाव असून तो तळोजा एमआयडीसीतील ध्रुव लॉजिस्टिक्समध्ये कामाला होता. राजूसिंग आणि त्याचा साथीदार मुकेशकुमार चौधरी हे दोघे दुचाकीने कल्याण-पनवेल रोडने आपल्या घरी घोट गाव येथे जात असताना हा अपघात घडला. तर अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला.







