| कुडाळ | प्रतिनिधी |
क.म.शि.प्र. मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या 14 वर्षांखालील मुलींच्या संघाने विभागीय आट्यापाट्या स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. या संघाने कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी यांसारख्या दिग्गज संघांना नमवून विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. हा संघ आता धाराशिव-कळंब येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.विजेत्या संघात कर्णधार लावण्या गावडे, जैलेशा तेजम, जुई चव्हाण, सृष्टी शेटकर, वैदेही कर्पे, स्वरा जाधव, शालिनी दळवी, वैभवी राणे, रोशनी कदम, दुर्वा देसाई, तनया घोगळे आणि चित्राली कुंभार या खेळाडूंचा समावेश होता. अंतिम सामन्यात लावण्या गावडे, वैभवी राणे, जैलेशा तेजम व वैदेही कर्पे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजयश्री खेचून आणली. या खेळाडूंना विजय मयेकर आणि सिद्धार्थ बावकर यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, का. आ. सामंत, आनंद वैद्य, सुरेश चव्हाण, महेंद्र गवस, विपिन वराडे, प्रवीण भोगटे, रंजन तेली, विजय मयेकर, अनिल पोवार, वैभव कोंडसकर, रामचंद्र खाकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्गाने सर्वांचे अभिनंदन केले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







