| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील महाजने येथील लिलावती दामोदर पारंगे यांचे शुक्रवार दि.27 मार्च रोजी दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्या 79 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुन, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
लिलावती पारंगे या स्वभावाने प्रेमळ होत्या. गावांमधील धार्मिक, सामाजिक कार्यात त्यांचे योगदान होते. शुक्रवार दि.27 दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचे राहत्या घरी निधन झाले. महाजने येथील स्मशानभूमीमध्ये सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील मंडळी, नातेवाईक, ग्रामस्थ, महिला मंडळींनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. लिलावती पारंगे यांचे पिंडदान अर्थात उत्तरकार्य मंगळवार दि.7 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता, त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती पारंगे कुटूंबियांकडून देण्यात आली.






