| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तराज सोसायटीतील एका झेरॉक्स दुकानात 4 एप्रिल रोजी मध्यरात्री घरफोडीची घटना घडली. यावेळी चोरांनी झेरॉक्स दुकानातील रोख रक्कम चोरून नेली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घरफोड्यांचे प्रमाण वाढू लागलेले आहे. चोरटे बंद घरांचे कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून चोरी करत आहेत. चार एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पनवेल शहरातील फडके नाट्यगृहाजवळील दत्तराज सोसायटीतील शिवशंभो झेरॉक्स आणि स्टेशनरीचे शटर चोरट्यांनी उचकटले आणि आत मध्ये प्रवेश करून रोखरक्कम चोरून नेली. यावेळी चोरांनी झेरॉक्स दुकानातील बनावट नोटा देखील चोरून नेल्या. या चोरीची माहिती सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकान चालकाला दुकानात चोरी झाल्याचे समजून आले. त्यानंतर याची माहिती पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली. या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.





