| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
अवैधरीत्या गॅसचे 33 बाटले जमिनीवर ठेवून एका बाटल्यातून दुसऱ्या बाटल्यामध्ये भरण्याची मशीन आणि डिजिटल काटा मिळून आल्या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी सोमराज कृष्णा रामदारा (राहणार मॅरेथॉन पळस्पे फाटा) याच्या विरोधात एक एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. एक एप्रिल रोजी चिंचवण या गावाजवळ व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर मधून घरगुती गॅस सिलेंडर मध्ये भरून जास्त दराने विक्री होत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. आणि कोकमखळ या ठिकाणी रस्त्याच्या कडेला शेतामध्ये असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये इंडेन, गो गॅस आणि एचपी गॅस असे एकूण 33 बाटले सापडून आले. तसेच या बाटल्यांमध्ये गॅस भरण्यासाठी लागणारी मशीन आणि डिजिटल काटा सापडला. परवाना आणि इतर कागदपत्रांची चौकशी केली असता ते सापडून आले नाहीत.






