। पनवेल । प्रतिनिधी ।
ट्रकने 16 वर्षीय मुलास धडक दिल्या प्रकरणी ट्रक चालका विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवधूत कोल्हारेकर हा तळोजा, फेस वन येथे राहत असून तो रिक्षाने चित्रपट पाहायला खारघर येथे जात होता. रिक्षातून उतरून सिग्नल चालू असल्याने रस्त्याच्या साईडला धानसर टोल नाका ते नावडे हायवे रोडकडून ट्रॅफिक चौकीच्या समोर अवधूत हा उभा होता. यावेळी ट्रक चालकाने समोरून धडक दिल्याने झालेल्या या अपघातामध्ये अवधूत याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापती झाल्या आहेत.







