| पनवेल | प्रतिनिधी |
तापमान वाढल्याने वन्यजीव मानवी वस्तीत शिरत असण्याच्या घटना विशेषतः उन्हाळ्यात घडत असतात. अशीच घटना खारघर येथील भारती विद्यापीठातील महिला वसतिगृहात घडली. वसतिगृहामध्ये आठ फूट लांबीचा अजगर शिरल्याने तरुणींची तारांबळ उडाली.
महिला वसतिगृहात अजगर आल्याचे वसतिगृहामधील काही मुलींना दिसला. त्यांनी तत्काळ वसतिगृह प्रशासनाला याबाबत माहिती दिली. वसतिगृह कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र अष्टविनायक मोरे यांना याबाबत कळवले असता, त्यांनी तात्काळ घटनास्थळी येत अजगराला पकडले. अजगराने त्या ठिकाणच्या कंबुतराला भक्ष्य केल्याचे दिसून आले. मोरे यांनी अजगराला पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. जंगल भागातील मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीव मानवी वस्तीत शिरकाव करत आहेत.







