| मुंबई | प्रतिनिधी |
न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब आयोजित एलआयसी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या दुसऱ्या फेरीत वाशी सेंटरचा मध्यमगती गोलंदाज आरव सेठी याने हॅट्ट्रिकसह सहा विकेट घेण्याचा पराक्रम केला.
आरवच्या या हॅट्ट्रिकमुळे घाटकोपर सेंटरचा दुसऱ्या डावात 119 धावांत खुर्दा उडवला आणि त्यांना फॉलोऑन दिला. रमेश दडकर मैदानावर झालेल्या सामन्यात दिवसअखेर वाशी सेंटरने पाच बाद 173 धावा केल्या होत्या. ठाणे सेंटरने बदलापूर सेंटरवर डाव आणि 172 धावांनी दणदणीत विजय मिळवला. माटुंगा जिमखाना मैदानावर झालेल्या सामन्यात तनयने 34 धावांत आठ विकेट्स घेत शानदार कामगिरी केली. डोंबिवली सेंटरने कल्याण सेंटरवर 92 धावांनी विजय मिळवला. माटुंगा येथे झालेल्या या सामन्यात कल्याण सेंटरचा संथ डावखुरा फिरकीपटू दर्शन राठोड याने सामन्यात 11 विकेट्स घेतल्या.







