| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील खैराट येथील ओलेंडर फार्म परिसरात डेकोरेशनचे काम करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 10 मे रोजी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास ओलेंडर फार्म, खैराट, ता. खालापूर येथे महिला तक्रारदार या डेकोरेशनचे काम करीत होत्या. त्यावेळी ओलेंडर फार्ममधील आरोपी ऋषिकेश रवींद्र सकपाल मोहाचीवाडी, नेरळ याने संबंधित महिलेस “आप बहुत खुबसुरत हो” असे बोलून अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे तक्रारदार महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर महिला फिर्यादीने खालापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात संबंधित गुन्हा नोंदविला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मनोहर पाटील हे करीत आहेत.







