| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे व त्यांच्या टीमने आज खोपोलीत एक धडक कारवाई केली असून, गुप्त माहितीच्या आधारे शहरातील पटेल नगर भागात एका घरात आई व तिचा मुलगा हे गांजा विक्री करतात अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या टीमला मिळाली होती. त्यानुसार आज दुपारी पटेल नगर येथील रस्त्यालाच लागून असणाऱ्या एका घरात पोलिसांनी धाड टाकून जवळपास चार किलो गांजा जप्त केला. या घरातून एक वयस्कर महिला व तिचा मुलगा असे दोघेजण हा गांजा विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिली असून, त्या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर खोपोली पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सचिन हिरे यांनी दिली.







