| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल पालिकेने शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता 100 वर्षांपूर्वी देहरंग धरण विकसित केले आहे. एकूण 15 किमी अंतरावर असलेल्या या धरणातून जलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या जलाशयात एकूण 3.57 दशलक्ष घनमीटर क्षमता पाणी साठवून ठेवण्याची क्षमता होती. मात्र, पावसाळ्यात माथेरानच्या डोंगराहून पाण्याबरोबर वाहत येणारा गाळ धरणात बसल्यामुळे खोली कमी होत आहे. परिणामी, पाणी साठवून ठेवण्याची क्षमताही कमी होत चालली आहे. जुलै ते फेब्रुवारी देहरंग धरणातून एकूण 12 एमएलडी पाणीपुरवठाकरण्यात येत असे. त्याचबरोबर उर्वरित पाणी एमजेपी आणि एमआयडीसीकडून घेण्यात येते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा पनवेल महापालिकेचा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. त्याशिवाय पनवेलकरांचा तहान पालिका प्रशासन भागवू शकत नाही. पनवेल शहराला सुमारे 27 एमएलडी पाण्याची गरज असून आजच्या घडीला एमजेपी आणि एमआयडीकडून प्रत्येकी 8 आणि 7 एमएलडी पाणी प्राप्त होत आहे. म्हणजे एकूण 15 एमएलड़ी पाणी बाहेरून प्राप्त होत आहे. याच पाण्यावर पनवेलकरांची तहान भागविण्याचा निर्णय पालिकेला योग्य वेळी निर्णय घेतला आणि पाणीटंचाईवर मात करण्यातरीता आतापर्यंत उत्तम नियोजन केले आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका पाणी पुरवठा विभागामार्फत कळविण्यात आले आहे की, देहेरंग धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा नियोजनात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. 25 मे पासून आठवड्यातून एक दिवस संबंधित भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.






