| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
लोणारे येथील शिवप्रेमी सामाजिक संस्थेच्यावतीने शिवराजाभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त मंगळवारी (दि.9) संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त गाण्यांसह वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराजांच्या शौर्य आणि इतिहासाला उजाळा देणारा कार्यक्रम रंगणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडमधील होणाऱ्या पहिल्या मंदिराच्या प्रतिकृतीचा अनावरण सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नवीन व्हिडीओ गाणे प्रदर्शित, छत्रपती शिवरायांवर अधारित कराओके गाण्यांची राज्यस्तरिय स्पर्धा, त्यानंतर महाराजांच्या शौर्य आणि इतिहासाला उजाळा देणारा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने “शिवशंभू गाथा” हा ऐतिहासिक कार्यक्रम घेतला जाणार आहे. एकच राजा इथे जन्मला फेम गायक शिवरत्न भुषण रोहित पाटील, कलर्स मराठी वाहिनीमधील गौरव महाराष्ट्राचा महाविजेता गायक वैभव थोरवे, सोनी टिव्हीवरील पहिला मराठी इंडियन आयडॉल विजेता गायक सागर म्हात्रे, सुप्रसिद्ध गायिका सानिया जांबेकर, पुजा म्हात्रे यांच्या बहारदार आवाजाने वेगवेगळ्या गाण्याचा आनंद घेता येणार आहे.






