। पनवेल । प्रतिनिधी ।
वेटरला टीप देण्याच्या कारणावरून बांबू डोक्यात मारून जखमी केल्याप्रकरणी आरोपी महेंद्र शेट्टी आणि हॉटेलमधील तीन ते चार वेटर यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रथमेश पवार हा सेक्टर 24, कामोठे येथे राहत असून तो त्याच्या मित्रासोबत दारू पिण्यासाठी वेलवेट हॉटेल, कोळखे येथे गेला होता. यावेळी वेटरला टीप देण्याच्या कारणावरून वेटर आणि त्यांच्यामध्ये वाद झाला. यावेळी महेंद्र शेट्टी आणि हॉटेलमधील तीन ते चार वेटर यांनी प्रथमेश याच्या डोक्यात बांबूने उपट मारली. तसेच, लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली. यावेळी प्रथमेशच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून नुकसान झाले.







