। पनवेल । प्रतिनिधी ।
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी तालीब शेख रा. तळोजा फेस टू यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पीडित महिला यांना आरोपी तालीब शेख याने लग्न करण्याचे आमिष दाखवले आणि त्यांच्यावर अत्याचार केला. यावेळी लग्न करण्यास सांगितले असता त्याने लग्न करण्यास नकार दिला आणि पीडित महिलेला दमदाटी केली.







