• Login
Sunday, September 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोबाईल प्रीपेड यूजर्ससाठी मोठी बातमी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 27, 2026
in sliderhome, नवी दिल्ली
0 0
0
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आता 28 नव्हे तर 30 दिवसांसाठी रिचार्ज

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

महिन्याला 28 दिवसांचा रिचार्ज करून पुन्हा पुन्हा रिचार्जच्या कटकटीत अडकणाऱ्या भारतातील कोट्यवधी मोबाईल प्रीपेड ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) दूरसंचार ग्राहक संरक्षण नियमांमध्ये 13वी सुधारणा जारी केली असून, ग्राहकांना अधिक वैधता कालावधीचे पर्याय उपलब्ध करून देण्याबरोबरच केवळ कॉल आणि एसएमएसची गरज असणाऱ्यांसाठी स्वतंत्र पॅक उपलब्ध करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे मोबाईल रिचार्जच्या पद्धतीत महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. याबाबतच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची रविवारी घोषणा करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

सध्या अनेक प्रीपेड ग्राहक 28 दिवसांच्या वैधतेचे रिचार्ज करतात. परिणामी वर्षभरात 12 महिन्यांपेक्षा जास्त वेळा रिचार्ज करण्याची वेळ येते. 30 दिवसांच्या वैधतेचा पर्याय उपलब्ध झाल्यास ग्राहकांना महिन्याच्या हिशोबाने रिचार्ज करण्याची सुविधा मिळू शकते. म्हणजेच 28 दिवसांच्या चक्राऐवजी पूर्ण महिन्याच्या कालावधीशी जुळणारा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

नव्या नियमांचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे केवळ आवाजातील कॉल आणि एसएमएसची गरज असलेल्या ग्राहकांसाठी स्वतंत्र विशेष दराचे पॅक उपलब्ध करून देणे. ज्या वैधता कालावधीसाठी कॉल, एसएमएस आणि इंटरनेट डेटा असलेले विशेष पॅक उपलब्ध असतील, त्याच वैधता कालावधीसाठी केवळ कॉल आणि एसएमएसचे पॅकही उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अशा पॅकच्या दरात डेटाची सुविधा नसल्याने त्यानुसार मोठ्या प्रमाणात प्रमाणबद्ध कपात करण्याची तरतूद आहे.

याचा फायदा विशेषतः इंटरनेट डेटाचा फारसा वापर न करणाऱ्या ग्राहकांना होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक, साधा मोबाईल वापरणारे ग्राहक, फक्त फोनवर बोलणे किंवा एसएमएससाठी मोबाईल वापरणारे ग्राहक यांना आपल्या गरजेनुसार पॅक निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. एकूणच, 30 दिवसांच्या वैधतेचा पर्याय आणि केवळ कॉल-एसएमएससाठी स्वतंत्र पॅक यामुळे प्रीपेड ग्राहकांना आपल्या वापरानुसार रिचार्ज निवडण्याची अधिक मुभा मिळणार आहे.

रिचार्जमध्ये ग्राहकांना पर्याय
नव्या व्यवस्थेमुळे ग्राहकांना गरज नसलेल्या डेटासाठी पैसे मोजण्याची आवश्यकता कमी होऊ शकते. कॉल, एसएमएस आणि इंटरनेट डेटा या तिन्ही सेवांचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी नेहमीचे एकत्रित पॅक उपलब्ध राहतील; तर केवळ कॉल आणि एसएमएसची गरज असणाऱ्यांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध होतील. त्यामुळे ग्राहकांना आपल्या वापरानुसार रिचार्ज निवडता येणार आहे. TRAIने या बदलाचा मसुदा 7 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करून संबंधितांकडून अभिप्राय मागवला होता. त्यानंतर 22 सप्टेंबर 2026 रोजी ‌‘दूरसंचार ग्राहक संरक्षण (13वा सुधारणा) नियम, 2026‌’ अधिकृतपणे जारी करण्यात आले.
13 रिचार्जची कटकट कमी होणार?
28 दिवसांच्या वैधतेमुळे अनेक ग्राहकांना वर्षभरात 13 वेळा रिचार्ज करावा लागू शकतो. 30 दिवसांचा पर्याय प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यास वर्षातील रिचार्जची संख्या 12 पर्यंत आणण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे ग्राहकांचा वेळ, रिचार्जची वारंवारता आणि अनावश्यक खर्च याबाबतही फरक पडू शकतो.
नियमांची अंमलबजावणी महत्त्वाची
TRAIने नियम जारी केले असले तरी प्रत्यक्षात विविध दूरसंचार कंपन्या हे पर्याय कशा प्रकारे उपलब्ध करून देतात, त्यांच्या किंमती किती असतात आणि ग्राहकांना हे पॅक किती सहज उपलब्ध होतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे नव्या नियमांचा प्रत्यक्ष फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपन्यांकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

रायगडमध्ये 12 ठिकाणी रोजगार महाकुंभ

Next Post

तटकरेंवर बाण, स्वकीयांवर वार!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

रायगडमध्ये 12 ठिकाणी रोजगार महाकुंभ

September 27, 2026
मुंबई ते उरण प्रवासी लाँच सेवा ठप्प
sliderhome

भाऊचा धक्का-रेवस जलवाहतूक होणार पूर्ववत

September 27, 2026
लोहारेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
sliderhome

लोहारेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

September 27, 2026
2000 वर्षांचा ऐतिहासिक ठेवा विकासाच्या प्रतीक्षेत
sliderhome

2000 वर्षांचा ऐतिहासिक ठेवा विकासाच्या प्रतीक्षेत

September 27, 2026
बँक व्यवहार उरकण्यासाठी रविवारीच ग्राहकांची धावपळ
sliderhome

बँक व्यवहार उरकण्यासाठी रविवारीच ग्राहकांची धावपळ

September 27, 2026
अलिबाग स्थानकाची स्वच्छता कागदावरच
sliderhome

अलिबाग स्थानकाची स्वच्छता कागदावरच

September 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?