| रायगड | प्रतिनिधी |
यंदाच्या मान्सून हंगामात कोकण विभागात पावसाचे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या आकडेवारीनुसार रायगड, ठाणे आणि पालघर या उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार घोडदौड करत गतवर्षीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद केली आहे. दुसरीकडे दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मात्र यंदा पावसाने काहीशी पाठ फिरवल्याने गतवर्षाच्या तुलनेत तूट निर्माण झाली आहे.
संपूर्ण कोकण विभागाचा विचार करता विभागात 2,580.2 मिमी या सरासरीच्या तुलनेत 2,479.5 मिमी म्हणजेच 96.1 टक्के पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात 2,174.3 मिमी सरासरीच्या तुलनेत तब्बल 2,320.1 मिमी म्हणजेच 106.7 टक्के पावसाची नोंद झाली आहे. अंबरनाथ तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 129.5 टक्के (2,253.2 मिमी) पाऊस झाला. त्यापाठोपाठ उल्हासनगर (123.0 टक्के, रायगड जिल्ह्यात 22 सप्टेंबर 2026 पर्यंत 2871.2 मिमी म्हणजेच सरासरीच्या 94.5 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मुरबाड (115.0 टक्के ), भिवंडी (109.2 टक्के ), ठाणे (109.0 टक्के ) आणि शहापूर (105.1 टक्के ) येथे मुसळधार पावसाची नोंद झाली, तर कल्याण तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 96.2 टक्के पाऊस झाला आहे. पालघर जिल्ह्यात यंदा 101 टक्के पावसाची नोंद झाली असून गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे, ज्यामुळे या भागातील शेतीला आणि जलप्रकल्पांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1 जून ते 9 सप्टेंबर 2026 या कालावधीत 23,148.46 मिमी म्हणजे 76.45 टक्के पाऊस पडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही रत्नागिरीप्रमाणेच गतवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला असल्याचे दिसून येत आहे. उत्तर कोकणात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भातशेती आणि जलसाठ्यांच्या दृष्टीने मान्सून दिलासादायक ठरला आहे.
रायगड जिल्ह्यात तालुकानिहाय पाऊस
उरण 139.2 टक्के (2734.0 मिमी) पावसासह प्रथम क्रमांक पटकावला आहे. .अलिबाग (115.5 टक्के ), पनवेल (110.5 टक्के ), माणगाव (105.9 टक्के ), महाड (102.7 टक्के ) आणि खालापूर (100.3 टक्के ) या तालुक्यांनी सरासरीची शंभरी ओलांडली आहे, तर श्रीवर्धन (82.0 टक्के ) आणि म्हसळा (82.9 टक्के) हे तालुके वगळता उर्वरित संपूर्ण जिल्ह्यात चित्र समाधानकारक आहे.






